साडेआठ वाजता ड्रायव्हरने एका ठिकाणी गाडी थांबवली. बाहेर खूप थंडी होती. तिथे एक देऊळ होते, पण ते रात्रीचे बंद झाले होते. शिवाय बर्याच पायर्या चढून गेल्यावर वर एक गुहा होती, तिथे पूर्वी पांडवांचे वास्तव्य होते. पण रात्री ते बघणे शक्य नव्हते. तिथेच एक झराही होता, हिमाचल प्रदेशमधली डोंगरातून येणारी पाण्याची पहिली शुद्ध धार तिथे होती. तिथे पिण्याचे पाणी असा बोर्ड लावला होता. आम्हांला मिनरल वॉटर प्या अशी सूचना मिळाली होती, पण आमच्यापैकी काहीजण आधी काश्मीरला गेले असतांना असेच झर्याचे पाणी प्यायले होते आणि त्यांना काहीही त्रास झाला नव्हता. त्यामुळे आम्ही ते थंडगार पाणी प्यायलो आणि बाटलीतही भरून घेतले. पण नंतर बहुधा उन्हाळा बाधल्यामुळे किंवा कदाचित सतत ब्रेड आणि पंजाबी पद्धतीचे अन्न खाल्यामुळे पाचसहा दिवसांनी काहीजणांना पोटदुखीचा सौम्य त्रास झाला, असो. जिथे आम्ही थांबलो होतो, तिथे जेवणाचीही सोय होती, पण आम्ही फक्त चहा घेतला. आणि पुढचा प्रवास चालू केला.
सिमल्याला आम्ही आमच्या हॉटेलवर साडेदहाला पोहोचलो. आमच्या हॉटेलला पार्किंगची सोय असल्याने ड्रायव्हरने बस तिथेच उभी केली होती. सिमल्याला हॉटेलला पार्किंगची जागा नसेल, तर गाडी पार्क कुठे करायची हा मोठाच प्रश्न असतो. वळणावळणांचे चढउताराचे रस्ते असलेल्या, डोंगरउतारावर दाटीवाटीने वसलेल्या ह्या शहरातल्या रस्त्यांवर जिथे जागा असेल तिथे गाड्या पार्क केलेल्या दिसतात. इथे काही ठिकाणी मुद्दाम पार्किंगसाठी बिल्डिंगही बांधलेल्या आहेत. आमच्यापैकी तिघाजणांची प्रत्येक ठिकाणची राहण्याची सोय त्यांच्या ऑफिसतर्फे वेगळ्या हॉटेलमध्ये केली गेली होती. त्यांचे हॉटेल जिथे होते, तिथे बस जाऊ शकत नव्हती. हॉटेल चढावरच्या ठिकाणी असल्याने तिथे सिमल्याची प्रसिद्ध लिफ्ट होती. तिथे जातांना तिकीट काढून लिफ्टने वरती जावे लागते, नंतर तिथूनच पुढे जाणारा पूल बांधलेला आहे त्यावरून थोडा रस्ता चालत जाऊन मग परत दुसर्या लिफ्टने वरती जावे लागते. ती लिफ्ट रात्री आठ वाजल्यानंतर बंद होते. पण ते तिथे उशीरा पोहोचल्याने त्यांना सामान घेऊन इतके उंच पायर्या चढूनच जावे लागले. शिवाय त्या हॉटेलवर जेवणाचीही सोय नव्हती, पण दुपारचे भरपूर जेवण झालेले असल्याने, आणि भरपूर दमल्याने, ते न जेवता तसेच झोपले.
इकडे आम्ही खोलीमध्ये आमचे सामान ठेवले आणि फ्रेश झालो. आमच्या खोल्यांपैकी एका खोलीमधून, डोंगरउतारावर दाटीवाटीने वसलेल्या घरांमधले दिवे लुकलुकतांनाचे दृश्य दिसत होते. सिमल्याला माकडे पुष्कळ आहेत, खोलीमध्ये माकडे येऊ नयेत म्हणून खिडकीची एक काच सोडली तर बाकी सर्व काचा उघडता येऊ नयेत अशा प्रकारे लावलेल्या होत्या. खोलीत पंखाही होता, पण तो लावण्याची गरज नव्हती. आम्हांला फारशी भूक नव्हती, पण आमच्या हॉटेलवर मात्र जेवण तयार होते. जेवण तयार असल्याचा निरोप मिळाल्याने, डायनिंग हॉलमध्ये जाऊन थोडे जेवून घेतले. पंजाबी पद्धतीच्या दोन भाज्या, रोटी, दाल फ्राय, राईस, सॅलड, लोणचे, पापड, स्वीट म्हणून शेवयांची खीर असा जेवणाचा मेनू होता. बुफे पद्धतीप्रमाणे जेवण मांडलेले होते, आम्ही डिश घेऊन त्यातले आम्हांला हवे ते वाढून घेतले आणि मोठे टेबल बघून तिथे जेवायला बसलो. बाजूला मोठी काच होती आणि त्यातून डोंगरउतारावर दाटीवाटीने वसलेल्या घरांमधले दिवे लुकलुकतांचे दृश्य दिसत होते. जेवण झाल्यावर आम्ही आमच्या रूमवर निघालो. आमचे हॉटेल चढावर बांधलेले असल्याने त्याचे रिसेप्शन सर्वात वरच्या चौथ्या मजल्यावर होते, डायनिंग रूम खाली तिसर्या मजल्यावर होती आणि राहण्याची सोय पहिल्या मजल्यावर होती. त्यामुळे लिफ्टने जातांना वरती जायचे आहे, की खाली याचा सुरूवातीला थोडा गोंधळ उडाला.

खोलीवर गेल्यावर हॉटेलचे दिलेले जाड ब्लॅंकेट घेऊन आम्ही गाढ झोपलो आणि दुसर्या दिवशी सकाळीच एकदम जाग आली. सकाळी साडेपाच-सहा वाजण्याच्या सुमारासच लख्ख उजाडले होते. आम्ही भराभर आटपू लागलो. "बाथरूममध्ये कोणी कपडे धुवू नयेत, कपडे धुतल्यास ५०० रूपयांचा दंड होईल." अशी सूचना बाथरूममध्ये लावली होती. आमच्यापैकी बहुतेकांनी पाचसहा ड्रेसच आणले होते आणि तेच धुवून वापरण्याचा त्यांचा बेत होता. म्हणून हॉटेलच्या सर्व्हिसशी बोलून या नियमाबद्दल नीट खुलासा करून घेतला. ड्रेस धुवून घेण्यासाठी लॉंड्रीची सोय होती, त्याचे चार्जेसही जरा जास्तच होते. लॉंड्रीत सकाळी ड्रेस टाकल्यास संध्याकाळपर्यंत इस्त्री करून मिळणार होता. बाकी कोणाला इनरवेअर्स धुवायचे असतील, तर त्याबद्दल त्यांचा आक्षेप नव्हता, पण तरीही फार कपडे धुवू नयेत, अशी त्यांनी सूचना केली. बहुतेक हॉटेलच्या बंद खोलीत आणि थंड हवेत कपडे नीट वाळणार नाहीत, म्हणून हा नियम केला असावा. मग लॉंड्रीला द्यायचे कपडे सगळ्यांनी काढून ठेवले. आणि सगळे नाश्ता करण्यासाठी डायनिंग रूममध्ये जमले. नाश्त्याला बटर सॅंडविच, जाम सॅंडविच, केलॉग्जचे कॉर्न फ्लेक्स, छोले भटुरे आणि चहा, कॉफी असा मेनू होता.
नाश्ता झाल्यावर आम्ही बसमध्ये बसून कुफ्रीकडे निघालो. वाटेत दुसर्या हॉटेलमध्ये उतरलेल्या तिघांना बसमध्ये घेतले आणि प्रवासाला सुरूवात केली. आमचं लक्ष आता खिडकीतून बाहेर दिसणार्या दृश्याकडे लागलं होतं. बाहेर दूरवर पसरलेली पर्वतशिखरं दिसत होती, त्यात एखादं बर्फाच्छादित हिमशिखर दिसतंय का, ते आम्ही डोळे ताणून पाहत होतो. थोड्या वेळाने काही काळ्या पर्वतशिखरांमागे असलेली काही धूसर पर्वतशिखरं आम्हांला दिसायला लागली, पण त्यांच्यावर ढग जमले आहेत, की बर्फ पडलंय ते मात्र कळत नव्हतं. अजून थोड्या वेळाने दूरची बर्फाच्छादित हिमशिखरं स्पष्ट दिसायला लागली. पण आमची बस जिथे थांबणार होती तिथे बर्फ नव्हतं. थोड्या वेळात बस थांबली. इथून पुढचा प्रवास घोड्यांवरून करायचा होता. आमच्यापैकी काहीजण तिथे चालत जाणार होते, तर आम्ही काहीजण घोड्यांवरून तिथे जाणार होतो. ज्यांना रोज दीडदोन किलोमीटर चालायची सवय आहे, ते थोडे कष्ट घेऊन, चढउतारांवरून त्या पॉईंटपर्यंत चालत जाऊ शकतात. पण नेपाळी घोडेवाले मात्र "पुढे सात किलोमीटर अंतर आहे, तुम्ही इतके चालत जाऊ शकणार नाही," असे खोटेच सांगत होते.
आमच्यापैकी चालत जाणारे पुढे निघाले, आम्ही आम्हांला नेणारे घोडे कधी येतात त्याची वाट बघत थांबलो. प्रत्येक घोड्याचे नेण्याआणण्याचे अडीचशे रुपये भाडे ठरले होते. घोडे यायला बराच वेळ लागला. आमचे घोडे नेणारा एक छोटा मुलगा होता, तो उत्तराखंड राज्यातून आला होता. तो आमच्या घोड्यांच्या दोर्या व्यवस्थित धरुन नेत होता. काही घोडेवाले मात्र एकावेळेस पाचसहा घोड्यांवरून प्रवासी नेत असल्याने एखाद्याच घोड्याची दोरी धरून बाकीच्या घोड्यांना रस्त्यावरून मोकळेच सोडून देत होते. घोडेही रस्त्याने बरोबर पुढे चालले होते. थोडे पुढे मात्र रस्त्याचा विशिष्ट भागच दलदल आणि चिखलाने भरलेला होता, घोडेवाल्यांना चालण्यासाठी कडेचा भाग मात्र कोरडा होता. ते पाहून बर्याच जणांनी, "घोडेवाल्यांनीच गिर्हाईके मिळावीत म्हणून मुद्दाम या भागात पाणी ओतून चिखल तयार केला असावा." अशी शंका व्यक्त केली.
याच चिखलात परतून येणार्या मोकळ्या सोडलेल्या एका घोड्यावरची मुलगी खाली पडली आणि त्या घोडेवाल्याबरोबर प्रवाशांचे भांडण सुरू झाले. त्यामुळे आमच्या पुढचे घोडे थांबले आणि आम्हांलाही थांबावे लागले. थोड्या वेळाने घोडे पुढे निघाले, चिखलाचा रस्ता संपून कोरडा रस्ता सुरू झाला. घोड्यावरून जातांना चढ आला की, पुढे झुकावे लागायचे आणि उतार आला की मागे झुकावे लागायचे. काही मिनिटांतच आम्ही त्या पॉईंटपर्यंत पोहोचलो. इथून पुढे आत घोडा नेण्याकरता प्रत्येक घोड्यापाठीमागे दहा रुपये गेटपास फी भरावी लागत होती. आम्ही फी भरून आत शिरलो आणि त्या मुलाने घोडा थांबवला. आता उतरायचे होते. घोड्यावर चढण्यापेक्षा घोड्यावरून उतरणे जास्त सोपे होते. त्या मुलाने आम्हांला आमची घोड्याची पावती नीट जपून ठेवून, परतायच्या वेळी त्यांच्या ग्रुपच्या माणसाला दाखवायला सांगितली. परत जातांना आम्हांला त्यांच्या ग्रुपच्या दुसर्या कोणत्या तरी घोड्यांवरून यावे लागणार होते. आम्ही घोड्यांवरून तिथे पोहोचेपर्यंत पायी चालत जाणारे आमच्या आधी तिथे पोहोचलेही होते आणि तिथल्या नाग मंदिरात दर्शनाला गेले होते.

सिमला, कुलू, मनाली ट्रीप भाग ३

No comments:
Post a Comment